गुरुवारी सहाव्या टप्प्याचे मतदान होत असताना पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. उत्तर 24 परगणा जिल्हय़ात बगदाह येथे केंद्रीय राखीव पोलीस दलांवर हल्ला करणाऱया जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार करावा लागला होता. यात एक व्यक्ती जखमी झाली होती तर दोन पोलिसांनाही जखमा झाल्या होत्या. निवडणूक आयोगाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे.
साधारणतः दीडशे लोकांच्या जमावाने एका मतदान केंद्राच्या संरक्षणासाठी उभ्या असणाऱया शस्त्रधारी पोलिसांवर हल्ला करून शस्त्रs पळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असून ते आयोगाला पाठविले जाईल, असे उत्तर 24 परगणा जिल्हय़ाच्या निवडणूक अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
गोळीबाराची दुसरी घटना याच जिल्हय़ात घडली. भाजप आणि तृणमूल यांच्या कार्यकर्त्यांच्या मारामारीमुळे तणाव निर्माण झाला होता. दंगलखोल जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला होता.









