बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध राज्यपालांना दिलेल्या पत्राविरोधात पक्षाचे वरिष्ठ नेते तोडगा काढणार आहेत. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यातील भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलह सोडविणार आहेत.
शनिवारी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर पक्षाध्यक्ष संपूर्ण परकरणाची शहानिशा करून या प्रकरणावर पडदा पडतील.
ईश्वरप्पा यांनी उचललेलं पाऊल अयोग्य असल्याचे सांगून पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली असल्याची माहिती आहे. पक्षाकडून असे सांगितले जात आहे की जर काही वाद झाला असता तर तो पक्षाच्या व्यासपीठावरच सोडवला असता तर बरे झाले असते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग ८ एप्रिलपासून तीन दिवसांच्या राज्य दौर्यावर येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ते पोटनिवडणुकीत पक्षाच्या निवडणूक प्रचाराला गती देतील आणि मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि ईश्वरप्पा यांच्यात निर्माण झालेली अंतरही दूर करण्याचा प्रयत्न करतील.