नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानातून सुटका केल्यानंतर तेथील निर्वासितांना रशियाच्या जवळील देशांमध्ये आश्रय देण्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्षेप नोंदवला आहे. निर्वासितांच्या नावाखाली दहशतवाद्यांना आश्रय मिळू नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.
रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारसाठी काम केलेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकांना तात्पुरता आश्रय मिळावा यासाठी अमेरिका अनेक देशांसोबत गुप्तपणे चर्चा केली आहे. रशियाने मात्र याला विरोध केला आहे. निर्वासितांच्या नावाखाली दहशतवादी दिसावेत अशी आमची इच्छा नाही, असं पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान या निर्वासितांच्या अमेरिका आणि युरोपच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ ते (पाश्चिमात्य देश) स्वत: व्हिसाशिवाय कोणालाही प्रवेश देत नसताना व्हिसाशिवाय आपल्या शेजारी देशांमध्ये पाठवलं जाणार आहे?, असा सवाल पुतिन यांनी सत्ताधारी युनायटेड रशिया पार्टीच्या नेत्यांशी बोलताना उपस्थित केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









