वाणिज्य मंत्रालयाकडून नवीन प्लॅटफॉर्म सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाणिज्य मंत्रालयाकडून व्यापारी करार केलेल्या देशांसोबत विविध वस्तूंची निर्यात केली जाते. यासाठी विविध दस्ताऐवज सादर करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. कोरोनाचे वाढते संकट आणि त्यातून सावरण्यासाठी व मालांची आयात निर्यातीचा मार्ग सुलभ होण्यासाठी हा मार्ग तयार केले असल्याचे सरकारने सांगितले आहे.
निर्यात करताना आयात केलेल्या देशाला वस्तूंचे स्रोत आणि उत्पन्ना संदर्भात सदर देशाची माहिती असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मुक्त व्यापार करारानुसार (एफटीए) सदस्य देशांची निर्यातीवर शुल्क आकारणीत सवलत मिळण्यासाठी हे दस्ताऐवज महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण सदस्य देश तयार मालवरच ही सुविधा देतात.
नवीन सुविधेचा वापर करुन मालांची आयात निर्यात करताना सादर करण्यात येणारे प्रमाणपत्र सर्व व्यापारांशी संबंधीत सणाऱया संस्थांना ही सोय वापरता येणार असल्याचे विदेशी व्यापारी महानिर्देशनालयाकडून एका नोटिसमध्ये सांगण्यात आले आहे.









