ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे.
22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी कोर्टाने दोषींच्या फाशीच्या वॉरंटवरील सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली होती.
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे चौघेही तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली.









