येथे जाणारा सुखरुप परतणे अशक्य
जगात अनेक विचित्र जागा आहेत. अशा ठिकाणांमधील रहस्यांची उकल करणे अत्यंत अवघड ठरते. अशीच एक जागा मेक्सिकोत असून तेथे अत्यंत विशाल आकारातील क्रिस्टल आहे. हे क्रिस्टल एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, पण तेथे जाणे म्हणजे मृत्यूच्या जबडय़ात जाण्यासारखे आहे.
मेक्सिकोच्या सिएरा डी नेका पर्वताच्या सुमारे 984 फूट खाली विशाल पिलर म्हणजेच स्तंभाच्या आकारातील क्रिस्टल अस्तित्वात आहेत, हे क्रिस्टन एका गुहेत असल्याने त्याला जायंट क्रिस्टल केव्ह नाव देण्यात आले आहे. 2000 साली या गुहेबद्दल वैज्ञानिकांना समजल्यावर ते दंगच झाले, कारण उत्खननादरम्यान पर्वताच्या इतक्या खाली हे अद्भूत दृश्य दिसून आले होते. हे क्रिस्टल प्रत्यक्षात जिप्समने तयार झाले आहेत. जिप्सम हे एकप्रकारचे खनिज असून ते पेपर आणि वस्त्राsद्योग क्षेत्रात वापरले जाते. तसेच सिमेंटमध्ये देखील याचा वापर होतो.

लाखो वर्षे जुने क्रिस्टल
क्रिस्टलने तयार झालेले हे स्तंभ 5 लाख वर्षांपेक्षाही अधिक जुने आहेत. यातील अनेक स्तंभ प्रचंड मोठे असल्याने त्यावर सहजपणे चालता येऊ शकते. पर्वताखाली दाबून राहिल्याने आता या ठिकाणी जाणे अशक्य आहे. पण एकेकाळी हे ठिकाण माणसांसाठी खुले असताना येथे अनेक मृत्यू झाले आहेत. क्रिस्टलमुळे येथील भीषण तापमान जीवघेणे आहे.
उष्ण तापमानामुळे होतो मृत्यू
या क्रिस्टलखाली अत्यंत उष्ण द्रव्यीभूत टेकडय़ा म्हणजेच मॅग्मा आढळून येत होता. सुमारे 2 कोटींहून अधिक वर्षांपूर्वी हा मॅग्मा भेगांमधून हळूहळू बाहेर येऊ लागला. हा मॅग्मा बाहेर आल्याने पर्वताची निर्मिती झाली आणि याच मॅग्माद्वारे क्रिस्टल निर्माण होत गेले. मॅग्ना बाहेर पडला त्यावेळी 98 फूट उंच आणि 33 फुट रुंद गुहेत भूमिगत जल अस्तित्वात होते. या पाण्यात एनहायड्राइट खजिन होते. गुहेचे तापमान 58 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. अधिक तापमान आणि हवेत 100 टक्के आर्द्रता राहिल्याने अनेक लोक तेथे डिहायड्रेशनमुळे मृत्युमुखी पडतात.









