ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे उभे करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ‘राष्ट्रीय चलनीकरण पाइपलाइन’ (एनएमपी) योजना सुरू करतील. ज्यामध्ये पुढील चार वर्षात विकल्या जाणाऱ्या मालमत्तांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
नीती आयोगाने सांगितले की, एनएमपीच्या माध्यमातून सरकार पुढील चार वर्षांच्या निर्गुंतवणुकीचा आराखडा तयार करेल आणि गुंतवणूकदारांना स्पष्ट संदेशही देईल. अर्थमंत्री सीतारामन अशा कंपन्यांची यादी, पॉवरग्रिड, महामार्ग इत्यादींची यादीही जाहीर करतील.
दरम्यान, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव तुहिन कांत पांडे यांनी अलीकडेच म्हटले होते की, सरकारने निर्गुंतवणुकीसाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांची यादी तयार केली आहे.