कोरोनाच्या या कठीण काळात आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. विविध भूमिका पार पाडणार्या महिलांना शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट रहावं लागतं. यासाठी सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करायला हवा.
- महिलांनी दिवसातला अर्धा तास स्वतःला द्यायला हवा. घरातली कामं करून, मुलांच्या मागे पळून व्यायाम होतो, असा अनेक महिलांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात तो चुकीचा आहे. कारण व्यायाम करताना सगळं लक्ष या कृतीकडे केंद्रित व्हायला हवं. महिलांनी आठ तासांची शांत झोप घ्यायला हवी.
- शरीराची कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी दूध तसंच दूधापासून बनलेले इतर पदार्थ खायला हवेत. दही, पनीर यांचा आहारात समावेश करावा. यासोबतच डाळी, चणे, मोड आलेली कडधान्यं, ज्वारी, बाजरी यांचाही आहारात समावेश व्हायला हवा.
- शरीरात चांगले फॅट्स जायला हवेत. यासाठी सुकामेवा, अळशी, शेंगदाणे, बदाम, आक्रोड, काजू यांचा समावेश आहारात करायला हवा.
- हंगामी फळं आणि भाज्या आहारात असायलच हव्यात. तसंच दिवसभरात दहा ते बारा ग्लास पाणी प्या. यासोबतच सूप्स, नारळपाणी, फळांचे ताजे रस यांचा आहारात समावेश करायला हरकत नाही.
- महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवं.
- फक्त कोरोनाकाळातच नाही तर महिलांनी आयुष्यभर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करायला हवा.









