प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तर क्लोजडाऊनमुळे रस्त्यावर बेवारस फिरणाऱया निराधारांचीही अवस्था बिकट झाली आहे. हिंदवाडी येथे गेल्या चार दिवसांपासून एक 60 वषीय महिला एका जागी निवांत बसून होत्या. मात्र त्यांची प्रकृती खंगत चालली होती.
याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी त्यांची विचारपूस करून त्यांचे कोणी नातेवाईक नसल्याचे लक्षात येताच जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या आश्रयगृहामध्ये दाखल केले. त्यावेळी गौतम कांबळे, अक्षय मोहनदास, विकास पाटील यांची त्यांना मदत झाली. आता त्या आजी आश्रमात स्वास्थपूर्ण जीवन जगत आहेत.
शहर परिसरात सध्या क्लोजडाऊन असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी उभे रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन माधुरी जाधव व त्यांच्या सहकाऱयांनी पोलिसांना फळे आणि पाणी वाटप केले. हरिष चव्हाण, विनय पाटील, अनिल कडोलकर, संजय मोरे, साई नाईक, राजेश दिवटगी यांच्यासह माधुरी यांनी हे साहित्य वितरित केले.









