प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा-मडगाव येथील श्रीमती शरद बोरकर अधिकारी यांनी हल्लीच निरंकाल-बेतोडा, फोंडा येथील वानरमारी जमातीची भेट घेऊन त्यांना सद्भावनेने जीवनावश्यक वस्तूचे वितरण केले.
जीवनावश्यक वस्तूमध्ये मिठाई, 15 साडय़ा, एक तेलचा डबा, एक पोते तूरडाळ, एक पोते साखर, दोन पोत्या तांदूळ, दोन पोते गहू व इतर खाद्यपदार्थ दिले. वानरमारी जमात ही कष्टकरी जमात असून निरंकाल भागात लोकांच्या बागायतीत काम करून आपली उपजीविका चालवित असतात.
मध्यंतरी या वानरमाऱयांना येथून हाकलून लावण्याचा देखील प्रयत्न झाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना मदत केली होती. प्रतिष्ठीत वकील तसेच समाजसेवक या वानरमाऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.









