यशवंत लांडगे / कोल्हापूर
वाढत्या कोरोनाला पायबंद घालायचा असेल तर नियम पाळलेच पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावोगावी होणाऱया यात्रा-जत्रांवर कडक निर्बंध लादले आहेत. ग्रामस्थ आणि भाविकही त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याने यात्राकाळात देऊळ बंदच राहत आहेत. त्यामुळे लाखो भाविकांनी गजबजणाऱया गावांत यंदा मात्र शुकशुकाटच दिसत आहे..
यंदा काही मिळवायचं नाही, फक्त जगायचं… त्यासाठी नियम पाळा आणि सुरक्षित राहा… कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे वाक्य आपल्याला वर्षभरापासून ऐकायला मिळत आहे. आणि ते गरजेचेही आहे. कारण जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने अनेकांचे जीव घेतले, प्रचंड वित्तहानी झाली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अजूनही कोरोना जायचं नाव काढत नाही. भिती कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनही वेगवेगळÎा पातळीवर कोरोनाशी लढत आहे. नियमावली करत आहे. पण खरी जबाबदारी आहे ती लोकांची. गर्दी न करणं हा या लढाईतील महत्वाचा भाग असल्याने गर्दी कशी टाळता येईल, याकडे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. त्यातूनच गर्दीची ठिकाणे आणि कारणे यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
सध्याचा काळ हा यात्रा-जत्रांचा आहे. गावोगावी होणाऱया यात्रांना लाखो लोक गर्दी करत असतात. लोकांसाठी भावनिक विषय असला तरी कोरोना फैलावणाऱया काही मार्गापैकी गर्दी हा एक धोकादायक मार्ग ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा-जत्रांवर निर्बंध लादले आहेत. देऊळ बंद ठेवणे, बाहेरूनच दर्शन घेणे, पै पाहुण्यांना न बोलावणे, जेवणावळी न घालणे. एवढंच काय गावाबाहेरील लोकांना या काळात गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त असून खेळण्याची व खाउची दुकाने, पाळणे, झोपाळे यांनाही यंदा गावात प्रवेश मिळत नाही. मनोरंजनाचे कार्यक्रम आणि स्पर्धा यांनाही फाटा दिल्याने भर यात्रेदिवशी गावांत शुकशुकाट पहायला मिळत आहे.
प्रशासनाच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाचीही चांगली साथ मिळत असून स्थानिक लोक व भाविकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याने नियमांची अंमलबजवाण करताना प्रशासनाला फारशी अडचण येत नाही. लोक मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेत असून पूजाअर्चा, पालखी सोहळयासह धार्मिक कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे लाखो लोकांच्या गर्दीमुळे फुलणाऱया रस्त्यांवर आता शुकशुकाट दिसत आहे. भाविकांनी केलेल्या भक्तीच्या जयघोषाचा आणि स्पीकरवर ऐकायला मिळणाऱया भक्तीगीतांचा आवाजच यंदा कानी न पडल्याने सर्व कसं सुनं सुनं वाटत आहे. तरीही भाविक सुरक्षेच्या कारणास्तव नियमांची पूजा करून भक्तीचा जागर करत यंदाच्या यात्रांचा आनंद घरातच बसून लुटत आहेत.
कोटÎवधींची उलाढाल ठप्प
यात्राकाळात थाटली जाणारी विविध खेळण्यांची, खाउची दुकाने आणि विविध व्यवसायाच्या माध्यमातून होणारी कोटÎवधींची उलाढाल यंदा मात्र ठप्प झाली. गावात प्रवेश नाही, त्यामुळे व्यवसाय नाही, अशी अवस्था असलेल्या या छोटÎा व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या वर्षभरापासून हा खेळ सुरु असून आणखी किती दिवस हे चालणार, हे सांगता येत नाही, हे सांगताना त्यांच्या डोळयात पाणी तरळत आहे. बालचमुंच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे. वडणगेसारख्या गावांत होणाऱया महाशिवरात्री यात्रेबरोबरच वाशी व अन्य ठिकाणच्या मोठÎा यात्रांवरही कोरोनाचे सावट आहे.









