प्रतिनिधी / कोल्हापूर
बालिंगा पंपींग स्टेशनवरील मेन मोटरपंप कंन्ट्रोल पॅनेल बदलण्याचे काम सोमवार 15 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुद्ध आणि शुद्ध जलउपसा केंद्र बंद राहणार आहेत. परिणामी बालिंगा केंद्रावर अवलंबून असणारे शहरातील ए, बी, सी आणि डी वॉर्डसह सलग्न उपनगरे आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. तर मंगळवार 16 रोजी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांची गैरसुविधा टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद :
ए, बी वॉर्ड : लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर पाण्याची टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आदी.
सी, डी, वॉर्ड : दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ, बिंदू चौक, आझाद चौक, महालक्ष्मी मंदीर, मिरजकर तिकटी, देवलक्लब, बाजारगेट, अकबर महोल्ला आदी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









