उत्तर प्रदेशमधील घटनेच्या विरोधात निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित समाजातील 19 वषीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निपाणी येथील दलित क्रांती सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रपतींच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.
दलित समाजावर देशामध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत. केवळ दलितच नाही तर इतर समाजातील महिलादेखील असुरक्षित झाल्या आहेत. तेंव्हा कठोर कायदे करून महिलांचे संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दबावतंत्र वापरण्यात येत आहे. ते थांबवावे आणि त्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दलित क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोककुमार असोदे, संघटनेचे पदाधिकारी मोहन घस्ते, विकास कुरणे, विलास यादगुडे, जितेंद्र जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









