प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी येथून चोरी करण्यात आलेल्या ट्रकच्या तपासासाठी निपाणी पोलिसांचे पथक गेले कार्यरत होते. त्यांना यामध्ये यश आले असून, चोरी गेलेल्या ट्रक अन्य 10 ट्रक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी संशयितांकडून माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. तर मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 10 डिसेंबर रोजी निपाणी येथील खडेद बंधू यांचा ट्रक खरी कॉर्नर येथील गॅरेजमधून चोरीस गेला होता. याच्या चौकशीसाठी निपाणी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी करतानाच अंकली येथे सदर चोरीचा ट्रक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाईदरम्यान चोरीच्या ट्रकसह इतर ट्रकदेखील पोलिसांना आढळून आले. त्यानुसार हे सर्व ट्रक शहर स्थानक परिसरात आणण्यात आले आहेत. यापैकी 5 ट्रकची कागदपत्रे व्यवस्थित आहेत तर उर्वरित 5 ट्रकची कागदपत्रे योग्यरित्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास चालविला असून, याप्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








