प्रतिनिधी /निपाणी
सीमाप्रश्न त्वरित सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. या मागणीसाठी सीमाभागातून पत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निपाणीतही पत्र मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. साखरवाडीतून मराठी भाषिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. बेळगावपाठोपाठ निपाणी भागातून हजारोंच्या संख्येने पत्रे पाठविली जाणार आहेत. निदान या पत्रांची दखल घेऊन तरी केंद्र सरकार सीमाप्रश्न सोडविण्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा मराठी भाषिकांनी व्यक्त केली. यावेळी प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, सचिन पोवार, नवनाथ चव्हाण, अरुण आवळेकर, बाबासाहेब तिप्पे, सुनील हिरुगडे, संदीप येरुडकर, अतुल चावरेकर, विजय ऱहाटवळ, संजय तिप्पे, बाळासाहेब कमते, अक्षय खोत, सागर कुंभार यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते.









