ऑनलाईन टीम / तरुण भारत
लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे खासदार भाजपचे खासदार तापीर गाव यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. लोकसभेत भाजप वगळता काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. यावर बोलताना तापीर गाव यांनी ही स्तुती सुमने उधळत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देशात रस्त्यांचे जाळे विणणारे ‘स्पायडरमॅन’ म्हणत कौतुक केले आहे.
वायएसआर काँग्रेस पक्षाचे एम भरत यांनी प्रश्न करत लोकसभेत‘२०२२-२३ या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा अमरावती आणि हैदराबादमधील रस्ते संपर्क वाढवण्यावर भर देतो. अशा परिस्थितीत यात काय प्रगती झाली, हे सरकारने सांगावे, असा प्रश्न केला आहे. तसेच काँग्रेस सरकारने केलेल्या कामामुळे आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सद्याचे केंद्र सरकार रस्त्यांच्या दर्जाकडे पूर्ण लक्ष देत नाही. रस्ता सुरक्षेसाठी वाटप केलेल्या बजेटपैकी फक्त दोन टक्के खर्च केला जातो, असे ही ते म्हणाले.
भाजपचे तापीर गाव यांनी मात्र नितीन गडकरी यांना ‘स्पायडरमॅन’ असे नाव देत, मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम वेगाने सुरू आहे, असे चर्चेत भाग ते म्हणाले.