तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीक जमातीचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सतरा व्यक्तींचा समावेश होता. यापैकी अकरा व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याची माहिती आज गुरुवारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
उर्वरित सहा व्यक्ती दिल्ली 2, इसमगड 1, पुणे 1, ठाणे 2 येथील असून त्या जिल्ह्यातील व राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले. याशिवाय दिल्लीतील कार्यक्रमात 14 व्यक्ती गेले असल्याचे पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले आहे. अशाप्रकारे एकूण 31 जणांची तपासणी विविध रुग्णालयात सुरू असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले. त्या अकरापैकी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. त्यामुळे दिवसभर सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाबत जे तर्कवितर्क सुरू होते त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आयसोलेशन वॉर्डमधील 48 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह
आयसोलेशन वॉर्डात आतापर्यंत 79 व्यक्ती होते. त्यापैकी 48 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत असेही शंभरकर यांनी सांगितले. सोलापूरकरांनी आता सूचनांचे पालन करावे विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
Previous Articleज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या : मुख्यमंत्री
Next Article धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण









