ओटावा : लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह चाचणीची सक्ती यापुढे देशात नसणार असल्याची घोषणा कॅनडा सरकारने नुकतीच केली आहे. विविध देशातून येथे येणाऱया पर्यटक व व्यावसायिकांना हा मोठा दिलासा असणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या संदर्भातली अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कॅनडाचे आरोग्य मंत्री जीन-युव्हस डुक्लोस यांनी सांगितले, की एक एप्रिल नंतर देशामध्ये प्रवेश करणाऱया लसीकरण झालेल्या प्रवाशांना चाचणी करण्याची गरज असणार नाही. लसीकरण झालेल्यांना कोरोना निगेटिव्ह चाचणी करण्याची सक्ती नसणार आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांसह विविध व्यावसायिकांना या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे. सध्याला मात्र कॅनडामध्ये प्रवेश करणाऱयांना कोरोना निगेटिव्ह चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
VANCOUVER, Nov. 30, 2020 -- A woman listens to instructions on a pilot project of rapid COVID-19 testing before taking flights at Vancouver International Airport in Richmond, British Columbia, Canada, on Nov. 30, 2020. As November nears its end, Canada reported a total of 374,051 COVID-19 cases and 12,076 deaths as of Monday afternoon, according to CTV. (Photo by Liang Sen/Xinhua via Getty) (Xinhua/Liang Sen via Getty Images)








