ऑनलाईन टीम / नाशिक :
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन २६, २७, २८ मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कोणत्याही धार्मिक अथवा सामाजिक सोहळ्यास परवानगी नाही. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीदेखील लागू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन झगडत असताना संमेलनाचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत होता. यावर उलटसुलट चर्चाही सुरू होत्या. अखेर कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलन स्थगित करून या चर्चांना पूर्णविराम दिला.









