नाशिक/प्रतिनिधी
महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंद करत अटकेचे आदेश दिले. यांनतर त्यांना पोलिसांनी मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. यांनतर राणेंच्या अटकेवर दोन्ही बाजूंनी टीका होताना दिसत आहे. दरम्यान नारायण राणेंची कोकणात जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहे. राऊत यांनी आज पुन्हा राणेंवर हल्लाबोल केला.
त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही. आता कानफडात मारण्याची भिती वाटते. कायदेशीर, नाहीतर लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक होते. याला जबाबदार नारायण राणे आहेत. राणें यांनी अतिशहाणपणा केला, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.
आपण नेहमी सभ्यता पाळावी. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. त्यांचा राजकारणातला मंत्र होता. जीओ ओर जीने दो. आम्ही उगाच कोणाला अंगावर घेणार नाही, पण जो अंगावर येणार त्याला सोडणार नाही. असा इशारा यावेळी राऊतांनी दिला. तसेच काही तरी एक जनआशीर्वाद यात्रा निघाली आहे. आपला त्याला विरोध नाही. जनआशीर्वाद यात्रा काढा किंवा येड्यांची जत्रा काढा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काहींनी त्यांच्या जत्रा केल्या, असा प्रत्यक्ष टोला राऊतांनी राणेंना लगावला. अनेक भाजप नेत्यांनी यात्रा काढल्या. पण, त्या कोणींनी शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही, असं राऊत म्हणाले.