प्रतिनिधी /फातोर्डा
शनिनगर, मोड्डी-नावेली, सासष्टी येथील श्री शनैश्वर मंदिराचा शनी अमावास्या उत्सव शनिवार 4 रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यजमानपद भूषवतील. सकाळी 6 वा. यजमानांच्या हस्ते अभिषेक, आरती व तीर्थप्रसाद होईल. दुपारी 12.30 वा. यजमानांकडून आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी आरती व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (भैय्यासाहेब) यांची खास उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.









