प्रतिनिधी / मडगाव
नावेली भाजप मंडळाने नुकतीच आपल्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी भाजपाचे दवर्लीतील जिल्हा पंचायत सदस्य व जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवार उल्हास तुयेकर, मंडळ अध्यक्ष परेश नाईक, अखिल भारतीय हज समितीचे अध्यक्ष शेख जीना, सर्वानंद भगत, दीपक सावंत, प्रमोद प्रभू, सत्यविजय नाईक, विद्याधर आर्लेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तसबिरीला पुष्पांजली वाहण्यात आली. डॉ. आंबेडकर हे थोर नेते होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय राज्यघटना तयार करताना सर्व घटकांचे हित जपण्याचे प्रयत्न झाले. आता लोकशाही व नीतिमूल्ये जपण्याची जबाबदारी आम्हा सर्व भारतीयांची आहे, असे प्रतिपादन तुयेकर यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी रूमडामळ, दवर्ली व आकें-बायश या पंचायत क्षेत्रांतील सुमारे दिडशे गरजू कुटुंबियांना जीवनाश्यक माल आपल्याकडून व मंडळाकडून पुरविण्यात आल्याची माहिती तुयेकर यांनी दिली. आतापर्यंत वरील तिन्ही पंचायत क्षेत्रांतील 400 कुटुंबियांना आवश्यक किराणामाल पुरविण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









