प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया नार्वेकर गल्ली परिसरात मागील दोन महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नळांमधून येणाऱया पाण्याला दुर्गंधी येत असून ते गढूळदेखील आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात असून पाणी पुरवठा विभागाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दूषित पाण्याचा पुरवठा ही समस्या बेळगावकरांना काही नवीन नाही. शहरातील बऱयाचशा भागात वारंवार गढूळ पाण्याचा पुरवठा होत असतो. बऱयाच ठिकाणी डेनेजवाहिन्यांना गळती लागली असून ते पाणी शुद्ध पाण्यामध्ये मिसळले जात आहे. यामुळे पाण्याला वास येणे, त्यामध्ये किड होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनदेखील त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
अखेर नार्वेकर गल्ली येथील नागरिकांनी एल ऍण्ड टी कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत व महादेव यांची भेट घेवून त्यांना दूषित पाण्याचा नमुना दाखविण्यात आला. लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे कंपनीच्या कर्मचाऱयांनी आश्वासन दिले. यावेळी गल्लीतील नागरिक विनोद कडोलकर, नंदकुमार अंगडी, राम हदगल, अनिल कपिलेश्वरी, शितल कुडतूरकर, जयश्री पवार, राम नाकाडी यांच्यासह इतर उपस्थित होते.









