दोडामार्ग / वार्ताहर:
केंद्रीय उद्योगमंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे आज जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आले असता दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी त्यांचे खास चाफ्याची फुले असणारा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नाम. राणे यांच्या चेहऱ्यावर चाफ्याची फुले पाहताच एकच सुखद हास्य उमटले.नाम. राणे यांच्या दोडामार्ग तालुक्यातील जन आशीर्वाद यात्रेला आडाळी येथून प्रारंभ झाला. आडाळी येथे श्री. राणे आले असता माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. राणे यांना चाफ्याची फुले आवडतात हे ध्यानात ठेवलेल्या संतोष नानचे यांनी पूर्वीप्रमाणे या खेपेसही चाफ्याच्या फुलांचाच पुष्पगुच्छ नाम. राणे यांना दिला. दोडामार्ग शहरातील गांधीचौकात यात्रा आल्यानंतरही श्री. नानचे यानी त्यांचे शहारावासीयांच्यावतीने स्वागत केले.









