मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला असून यामध्ये राज्यातील चार नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं. यामध्ये खासदार नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदं आलेली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला. नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं त्यांना दिलं. खरंतर नारायण राणे यांची कामाची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक मंत्रीपदं त्यांनी सांभाळली आहेत.पण त्यांना आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खातं दिलं आहे.
महाराष्ट्र आणि देशामध्ये या माध्यमातून मोदींना जी काही अपेक्षा आहे, विशेषत: रोजगार वाढवण्याचं, हे एक मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. पण एकमात्र, भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत, आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला आहे, मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले. कपिल पाटील आणि भारती पवार राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहेत.
केंद्रात पाहिलं तर अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरुन आलेल्या अनेकांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. सक्षमता पाहून दिलं असावा असं मी मानतो, असंही यावेळी ते म्हणाले.त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. आर्थिक, महागाई, आरोग्यविषय आणीबाणी, बेरोजगारी या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. नवीम मंत्र्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदाना द्यावं, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








