ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. तर कारवाईसाठी महापालिकेचं पथक अधीश बंगल्यावर दाखल झालं आहे. दरम्यान, नारायण राणे स्वतः अधीश बंगल्यात उपस्थित आहेत.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती. बंगल्याच्या बांधकामात अनियमिततेचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पालिका काय कारवाई करणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा