नवे वर्ष नवी सुरुवात
स्वतःच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कीर्ति कुल्हारीने स्वतःचा आगामी चित्रपट ‘नायिका’च्या चित्रिकरणाला चालू आठवडय़ात सुरुवात केली आहे. कीर्तिने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर तीन छायाचित्रे शेअर केली आहेत. अजय किरण नायर यांची पटकथा असलेल्या या चित्रपटात कीर्ति पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत असावी असे छायाचित्रांमधून वाटते.
नायिका नवे वर्ष…नवी सुरुवात…एका नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले. उत्तम पटकथा आणि धमाकेदार व्यक्तिरेखा. चित्रपटाशी संबंधित मोठय़ा घोषणा लवकरच होतील असे कीर्तिने सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत म्हटले आहे.
कीर्तिने स्वतःच्या बॉलिवूड कारकीर्दीची सुरुवात 2010मध्ये ‘खिचडी द मूव्ही’पासून केली होती. पण तिला खरी ओळख 2016 मध्ये प्रदर्शित पिंक चित्रपटामुळे मिळाली. त्यानंतर तिने इंदू सरकार, उरी द सर्जिकल स्ट्राइक, ब्लॅकमेल, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचबरोबर तिने अनेक वेबसीरिजमध्ये अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
कीर्ति लवकरच ह्युमन वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. याची कहाणी भारतातील मेडिकल ड्रग ट्रायलवर आधारित आहे. यात कीर्तिसह शेफाली शाह, विशाल जेठवा, राम कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ह्युमन 14 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.









