सावंतवाडी/ प्रतिनिधी-
तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप लक्ष्मण पवार यांची कुडाळ येथील प्रांत कार्यालयात शिरस्तेदार या पदावर बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी कुडाळ प्रांत कार्यालयातील मनोज मुसळे यांची सावंतवाडी नायब तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात गेली पाच वर्षाहून अधिक काळ ते उत्कृष्ट काम केले आहे
वेगुर्ला येथे त्यांची पहिली नेमणूक झाली. त्यानंतर २००० मध्ये त्यांना अव्वल कारकुन म्हणून बढती मिळाली. २०१७ मध्ये ते सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात नायक तहसीलदार म्हणुन रूजू झाले आहेत. डोंगर खचून झालेले नुकसान तसेच तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान त्यांनी योग्य प्रकारे पंचनामे करून नकसान भरपाई मिळून दिली. कोरोना काळात तर परप्रांतीय मजूरांचा लोंडा येथे थांबून त्यांना अन्न धान्यापासून आरोग्यापर्यंत सगळीच मदत करून त्यांना स्वगृही पाठविण्यापर्यंत सगळ्याच कामात पवार यांनी जोखमीची कामे वरिष्ठांच्या मार्गदशनानुसार पार पाडली. याकाळात सुमारे ३००० हजार मजुरांना त्यांनी स्वगृही सुखरूप पाठविले.
नायब तहसीलदार प्रदीप पवार यांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी व उत्कृष्ट काम केले प्रांताधिकारी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. जिथे काम करावे ते मन लावून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होईल अशी कामकरण्याची त्यांनी पद्धती आहे. यातूनच त्यांनी खूप माणसे जोडलेली आहे.