कोरोनावरील उपचारासंबंधीच्या संशोधनात दावा
कोरोना विषाणूच्या प्रकोपाने बेहाल जगातील वैज्ञानिक सातत्याने यावरील अचूक उपचार शोधत आहेत. 2003 च्या सार्स महामारीवेळी ज्या पद्धतींनी नियंत्रण मिळविण्यात आले होते, काहिशा त्याचप्रकारे सार्स-कोव-2 विषाणूवर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे. जर्नल रेडॉक्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार नायट्रिक ऑक्साइड अँटीवायरल गुणांनी युक्त कंपाउंड असून ते शरीरातच तयार होते. सार्स-कोव-2 वर थेट प्रभाव पाडणारा नायट्रिक ऑक्साइड एकमात्र पदार्थ असल्याचे स्वीडनमधील संशोधक ए.के. लुंडकविस्ट यांनी म्हटले आहे.
मृत्यूदर कमी करणार
नायट्रिक ऑक्साइड रुग्णालयांवरील वाढलेला भार आणि मृत्यूदर कमी करू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे. नायट्रिक ऑक्साइड शरीरात नैसर्गिक स्वरुपात निर्मित एक कंपाउंड आहे. हे विविध अवयवांना नियंत्रित करण्यात एका हार्मोनप्रमाणे काम करते. 2003 च्या सार्स महामारीदरम्यान याचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. याच्या वापरामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमधील सूज कमी झाली होती.
नायट्रिक ऑक्साइड संसर्गापासून बचाव करते. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल दोन्ही असल्याने संशोधकांना यात स्वारस्त होते. 2003 साली एसएनएपीने रिलिज्ड एनओ वेगळेच अँटीव्हायरल ठरले होते. कोरोना विषाणू या कंपाउंडवर कशाप्रकारे व्यक्त होतो हे संशोधकांनी शोधून काढले आहे. प्रभावी लस उपलब्ध होत नाही तोवर एनओ इन्हेलचा वापर लाभदायक ठरू शकतो असे संशोधकांनी म्हटले.









