बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) नायजेरियन नागरिक व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून ४० लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. युगो चुकव (वय ३४) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी व्हिसावर बेंगळूरला आला होता पण शिक्षण पूर्ण न केल्याने ड्रग्स विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पोलिसांना माहिती मिळाल्यावर कावेरी नगरातील ठिकाणावर छापा टाकून त्याला अटक केली.









