कंपनीचे बाजारातील भांडवल जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या घरात
मुंबई
ब्यूटी(सौंदर्य) उत्पादनाशी संबंधीत व्यवसाय करणरी नायकाची सहयोगी कंपनी एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्सचे समभाग बुधवारी शेअर बाजारात मजबूत स्थिती प्राप्त करत लिस्टिंग झाले आहेत. बीएसईवर नायकाचा समभाग इश्यू प्राईसने 78 टक्क्यांवर पोहोचत 2,001 वर खुला झाला आहे. दिवसभरात कामगिरी करत असताना समभागांनी 89 टक्के तेजीसोबत 2,129चा उंची प्राप्त केली आहे. या सोबतच नायकाचे बाजारातील भांडवल एका दिवसात नवी उंची गाठून 1 लाख कोटी रुपयावर राहिले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात नायकाचे समभाग 2,018 रुपयावर लिस्ट झाले आणि 2,129 रुपयाची नवी उंची नोंदवली आहे. समभागाचे लिस्टिंग अगोदर गुरुवारी होणार होते, परंतु कंपनीने बुधवारीच लिस्ट केले आहे. सदरच्या इश्यूसाठी 216.59 कोटी समभागाची बोली प्राप्त झाली होती. तर कंपनीने 2.64 कोटी समभाग सादर पेले होते. म्हणजे इश्यू 82 पट भरले होते.
28 ऑक्टोबर रोजी खुला झाला होता इश्यू
नायकाचा इश्यू 28 ऑक्टोबर रोजी खुला झाला होता, आणि 1 नोव्हेंबर रोजी बंद झाला होता. कंपनीचे आयपीओमध्ये समभागाचे भाव हे 1,085 ते 1,125 रुपये राहिले होते. कंपनी बाजारातून 5,352 कोटी रुपये जमा करण्यासाठी उतरली होती.
सर्वात मोठा ऑनलाईन ब्रँड नायका देशातील सर्वात मोठा ऑनलाईन मार्केट प्लेस ब्रँड आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 1.71 कोटीच्या ऑर्डरची डिलिव्हरि केली होती. 80 ऑफलाईन कार्यालयांसोबत देशात 40 देशांमध्ये कंपनी आपला व्यवसाय करत आहे.









