ऑनलाईन टीम / पुणे :
समस्त नामदेव अंतरपाट संस्थेतर्फे पुणे शहरातील शिंपी समाजातील संस्थांच्या सहकार्याने कै. प्रभाकर गोविंद उर्फ बाळसो बाकरे यांच्या स्मरणार्थ 35 व्या राष्ट्रीय ऑनलाईन वधू-वर परिचय मेळावा उद्या दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात आला आहे.
समाज वांधवांनी गुगल मीटद्वारे ऑनलाईन वधु-वर मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी व्हाॅटस अप वर दिलेल्या फाॅर्मद्वारे आपली नोंदणी करावयाची आहे.
सदर मेळावा नामदेव, भावसार, अहिर, रंगारी, वैष्णव, माहेश्वरी, तेलगु, मेरु, निराळी, छिप्पा, छत्री, दर्जी, या शिपी समाजातील पोटजातींसाठी आयोजीत केलेला आहे. यानिमित्त कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरांचल, तामिळनाडू आणि दिल्ली यथील समाजबांधव बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन साई संस्थांन शिरगावचे मुख्य सचिव प्रकाश देवळे यांच्या हस्ते होणार आहे. असे संस्थेचे सचिव मोहन बसाळे आणि अजित कुमठेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.








