प्रतिनिधी / बेळगाव
दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 218 वी जयंती तसेच सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. निवृत्त सरकारी निबंधक श्रीकांत पारिश्वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी चेअरमन विठ्ठल शिरोडकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, संस्थापक मोहन कारेकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संजय सूर्यवंशी, मनोज राजापूरकर, श्याम मुतकेकर, ओमकार हळदणकर, चंद्रकांत बांदिवडेकर यांचा सन्मान करण्यात आला. संध्या पाटील, अनंत पाटील, यश कुगजी, गौतमी हलगेकर, स्वयम कारेकर, खुशी शिरोडकर, वसुधा सांबरेकर, तनया बांदिवडेकर, संजना पाटील, वेदांत वेसनेकर, प्रणाली पाटील, मनाली बांदिवडेकर, प्रेरणा महागांवकर, मयूर बांदिवडेकर, वैष्णवी मोहिते, संजीवनी तेरगावकर, योगेश सांबरेकर, शुभम खनगावकर, शिवानी बांदिवडेकर, रोहित वेर्णेकर, समृद्धी चिकोर्डे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक शिरोडकर यांनी आभार मानले.









