प्रतिनिधी /वास्को
मुरगाव हिंदु समाजाचे अध्यक्ष व उद्योगपती नारायण उर्फ नाना बांदेकर यांनी शुक्रवारी हिंदु समाजाच्यावतीने मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चाही केली.
यावेळी त्यांच्यासोबत हिंदु समाजाचे पदाधिकारी प्रताप गावकर, शैलेश बांदेकर, दामू कोचरेकर व इतर सदस्य उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर व नगरसेविका श्रध्दा आमोणकर यांनी बांदेकर व त्यांच्या सहकाऱयांचे कार्यालयात स्वागत केले. मुरगावचे आमदार बनल्यानंतर प्रथमच बांदेकर यांनी आमोणकर यांची भेट घेऊन हिंदु समाजातर्फे त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी मुरगाव हिंदु समाज, नियोजित महालक्ष्मी मंदिर, वास्को मुरगावचा विकास अशा विविध विषयांवर आमदार आमोणकर यांच्याशी चर्चा केली. हेडलॅण्ड सडा भागात मुरगाव हिंदु समाजाचे एखादे सभागृह असावे असा समाजाचा विचार असून हे सभागृह उभारण्यासंबंधीही आमदार व उद्योगपतींमध्ये चर्चा झाली.









