ऑनलाईन टीम / पुणे :
काँग्रेसचे नाना पटोले हे राज्यातील पप्पू, केंद्रातही एक पप्पू आहेत. ते आपल्या मनाला येईल ते बोलत राहतात, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसने भाजपवर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ‘मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधान बदलायला हवेत, असे वक्तव्य केले होते. पटोले यांच्या या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
- केंद्रात जसे एक पप्पू आहेत…
ते म्हणाले, नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवे वादळ उठण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी राज्यातल्या साखर कारखान्यांबाबत अमित शहांना दिलेल्या पत्रात नितीन गडकरी यांच्या कारखान्याचे नाव होते. त्यावरुन भाजपचा गडकरींना संपवण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेवरही चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी सर्वच कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ती यादी मी नव्हे अण्णा हजारेंनी केली आहे. त्यामुळे त्यात नितीन गडकरींच्या कारखान्याचे नाव आले. मात्र, आपल्या कारखान्याविषयी गडकरींनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिले आहे. ते पुन्हा देतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.