औरंगाबाद\ ऑनलाईन टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आपेक्षा आहे. आपला पक्ष मोठा करावा असे प्रत्येकाला वाटतं आणि तसं करण्यात काही गैर नसल्याचे म्हणत अमित देशमुख यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दिला आहे. ते आज औरंगाबादेत बोलत होते.
स्वबळाच्या नाऱ्याचा गैरअर्थ काढणं चुकीचं आहे. आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याबाबतही निश्चितपणे विचार केला जाईल, असे अमित देशमुख यावेळी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत भूमिका स्पष्ट ठेवली आहे. नाना पटोले यांनी यापुर्वीच म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाच काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








