नागपूर \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर असून नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी मृत मनोज ठावकरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच मनोज ठावकरच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांना नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या गंभीर आरोपावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरं भरलं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेला जेवण जात नाही, पाणी देखील पिता येत नाही आहे. ते अत्यंत घाबरले असल्यामुळे त्यांना नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली आहे. असं आता नाना पटोलेंच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं पाहिजे ते इतके का घाबरले आहेत? नेमकं कारण काय? का पाळत ठेवली आहे? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
नागपूरमध्ये मनोज ठावकरचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. मृत मनोजच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. कुटुंबीयांना भाजपकडून २ लाखांची मदत केली असून राज्य सरकारकडूनही मदत मिळवून देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








