रकुल प्रीत अन् जॅकी भगनानी प्रेमाच्या नात्यात
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीसोबतच्या प्रेमसंबंधांची यापूर्वीच जाहीर वाच्यता केली आहे. आता एका मुलाखतीत रकुलने स्वतःचे प्रेमसंबंध जगजाहीर करण्याच्या निर्णयाबद्दल भूमिका मांडली आहे. नाते लपविले जाऊ नये आणि आमच्या नात्यात लपविण्यासारखे काहीच नसल्याचे आम्हा दोघांचे मत आहे. परस्परांचा आदर करणे हे हे नात्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. परंतु काही जोडपी स्वतःचे नाते लपवून ठेवू पाहतात. परंतु आम्ही दोघे त्या प्रकारातील निश्चितच नाही आहोत असे रकुलने म्हटले आहे. जॅकीने रकुलच्या वाढदिवशी शुभेच्छा देत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

रकुल प्रीत स्वतःचे खासगी आणि प्रोफेशनल लाइक अत्यंत वेगळे ठेवू इच्छिते. अजय देवगण सोबतच्या ‘रनवे 34’ या चित्रपटात ती दिसून येणार आहे. याचबरोबर ‘अटॅक’, ‘मेडे’, ‘थँक गॉड’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘इंडियन 2’ या चित्रपटांमध्ये ती काम करत आहे.









