घातपाताची शक्यता
प्रतिनिधी /म्हापसा
बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बामणवाडा कांदोळी येथे खुल्या जागेत पार्क करून ठेवण्यात आलेल्या जीव सुरक्षा गार्ड कर्मचाऱयांच्या एकूण दहा दुचाक्या बुधवारी पहाटे अज्ञाताकडून जाळून भस्मसात करण्यात आल्याची तक्रार कळंगुटच्या पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीची दखल घेत तात्काळ कळंगूट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी केली असता पहाटे 3.30 वा. कुणातरी अज्ञात बुरखाधारी व्यक्ती दुचाख्यांना आग लावत असल्याचे पोलिसांना दिसल्याने संशयिताचा लवकरच शोध घेणार असल्याचे कळंगूट पोलिसांनी सांगितले. दरम्यान राज्यातील एका नामांकित कंपनीत या भागातील किनारी भागात सुरक्षा जीव रक्षकाचे काम करणारे 25 ते 30 परप्रांतीय कामगार या भागातील खासगी खोल्यात राहतात. रात्री अपरात्री कामावरून परतल्यावर ते आपल्या दुचाक्या जवळच्या खुल्या जागेत पार्क करून ठेवत हेते. हीघातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून कळंगूट पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.









