प्रकल्पामुळे देवगडचा होईल कायापालट
गिर्ये येथे होणार बंदर
देवगडमधील शेकडो तरुणांना मिळेल रोजगार
शिवसेनेचा विरोध मात्र प्रकल्प समर्थकांचे पारडे जड
प्रशांत वाडेकर / देवगड:
तीन लाख कोटी गुंतवणूक असलेल्या भारतातील सर्वात मोठय़ा नाणार रिफायनरी प्रकल्पामध्ये देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर या दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध झाल्याने हा प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली. मात्र, रिफायनरीला प्रकल्पाला समर्थन देणाऱयांची संख्या वाढत असल्याने हा प्रकल्प पुन्हा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाला स्थानिकांना विरोध कधीच मावळला असून केवळ शिवसेनेचाच विरोध या प्रकल्पाला दिसून येत आहे. मात्र, शिवसेनेतही प्रकल्पाविरोधावरून एकमत नसल्याने प्रकल्प समर्थकांचे पारडे जड होऊ लागले आहे. हा प्रकल्प झाल्यास गिर्ये येथे कच्चे तेल उतरविण्यासाठी मोठे बंदर उभारले जाणार असून शेकडो स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शासनाकडून जे सुरुवातीला प्रबोधन व्हायला हवे होते ते वेळीच झाले नाही. त्यामुळे प्रकल्प विरोधकांनी याची संधी साधत स्थानिकांना भडकविण्याचे काम केले. देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर ही दोन गावे या प्रकल्पात जात असल्याने सुरुवातीला या प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले होते. वास्तविक पाहता गिर्ये व रामेश्वर येथील बहुतांशी भुखंड हा 2009-2010 मध्येच खासगी कंपनींना विकला गेला आहे. 2004 मध्ये गिर्ये येथे औष्णिक उर्जा प्रकल्प होऊ घातला होता. त्यावेळी देखील या प्रकल्पाला विरोध झाल्याने हा प्रकल्प शासनाने गुंडाळला होता. गेली 40 वर्षे विजयदुर्ग बंदराचा विकास प्रकल्प रखडला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे विजयदुर्ग बरोबर गिर्ये बंदराचा विकास होणार आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्प हा तीन लाख कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आरामको (सौदी-अरेबिया) ची 50 टक्के गुंतवणूक आहे. उर्वरित इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची 25 टक्के गुंतवणूक तर हिंदूस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांची मिळून 25 टक्के गुंतवणूक आहे. 60 दशलक्ष मेट्रीक टन (वार्षिक) व दिवसाला 12 मि. ली. बॅरल क्रूड इतकी या प्रकल्पाची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 20 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला 65 हजार कोटी कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीचे निर्माण होणार आहे.
देवगड तालुक्यात या प्रकल्पासाठी लागणारे कच्चे तेल उतरविण्यासाठी केवळ गिर्ये येथे बंदराचा समावेश केला आहे. गिर्ये येथून पाईपलाईनने नाणार येथे कच्चे तेल प्रकल्पात रिफायनरीसाठी नेले जाणार आहे. रिफायनरीमध्ये तयार होणाऱया नाफ्त्यातून पेट्रोकेमिकल्स उत्पादने तयार होणार आहेत. या उत्पादनातून प्लास्टिकच्या सर्व वस्तू, रंग, कृत्रिम कापड, फर्टिलाजर्स, औषधे, टायर्स, पत्रे, पाईप्स, विमान, मोबाईल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुटे पार्ट यांची निर्मिती उद्योग येथे सुरू होणार असून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक व आरोग्यासाठी चांगल्या सुविधा देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थनिकांना उपलब्ध होतील. या प्रकल्पातून होणारा विकास स्थानिकांना हवा आहे. यासाठी देवगडमधील व्यापाऱयांनी देखील प्रकल्पासाठी पाठींबा दिला. देवगड पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपंचायतीनेही प्रकल्पाच्या बाजूने पाठींबा देणारा ठराव शासनाला सादर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या समर्थनार्थ वाढू लागलेला जोर राज्य शासनाला प्रकल्प सुरू करण्यास भाग पाडू शकतो. ��दा काही शिक्षक, उद्योजक, व्यापारी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱयांनी घेतला आहे. या सर्वांची माहिती आधार बँक लिंकवरून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी वसूल झालेली रक्कम तलाठी कार्यालयात जमा केली जाईल. नंतर ती तहसीलच्या तिजोरीत वर्ग केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.









