प्रतिनिधी/ बेळगाव :
अखिल भारतीय नाटय़ परिषदेने केलेल्या आवाहनानुसार परिषदेच्या बेळगाव शाखेने बॅकस्टेज कलाकारांसाठी निधी संकलित केला. अखिल भारतीय नाटय़ परिषदेला हा निधी पाठविण्यापूर्वी बेळगावमध्ये असणाऱया स्थानिक बॅकस्टेज कलाकारांना हा निधी देण्याचा निर्णय बेळगाव शाखेने घेतला.
त्यानुसार बेळगावचे बॅकस्टेज कलाकार गुरु पेडणेकर यांना 5 हजार रुपये व राजा यांना 3 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे मारुती वद्दार यांना 2 हजार रुपये देण्यात आले. बेळगाव शाखेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला. याप्रसंगी सुधीर शेंडे, नियामक मंडळाच्या सदस्या वीणा लोकूर आदी उपस्थित होते.









