पेठ वडगाव / प्रतिनिधी
पेठ वडगाव शहराच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून वडगाव परिसरातील सर्वसामान्य लोकांची सोय झाली आहे. या कोविड सेंटर प्रशासनाकडून व लोकसहभागातून लागेल ती मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. जनतेने लक्षणे दिसताच तपासणी करा, उपचारासाठी दाखल व्हा,आपण बरे होता. लक्षणे लपविणे व वेळ घालविल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. तर माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहीमेत वडगाव शहरातील सर्व नगरसेवक यांनी सहभाग घेवून जनता कोरोनामुक्त आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
पेठ वडगाव येथे नुकतेच उद्घाटन झालेल्या कोविड सेंटरच्या पाहणीकरिता पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली. यावेळी प्रशासन व नगरसेवक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, संघटक अजय थोरात, यादव पॅनेलच्या नेत्या विद्याताई पोळ आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संदीप पाटील, आदीसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत. लक्षणे लपविणे व दुर्लक्ष करणे कोरोना संसर्ग वाढण्याचे कारण बनत आहे. नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोना रुग्णाशी संपर्क आल्यास न लपवता आपली तपासणी करावी. उपचार घेण्याबाबत आवाहन करून ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन केले.यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी कोरोना सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून मदत उपलब्ध होत आहे. पालकमंत्री यांनी कोविड सेंटरला लागणार्या सुविधाबाबत कळवावे असे सांगितले.
Previous Articleबेरोजगारीला कंटाळून पाडळी बुद्रुकच्या अभियंत्याची आत्महत्या
Next Article सांगली जिल्हय़ात नवे 886 रूग्ण, तर 716 कोरोनामुक्त









