सांखळी / प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातील पाळी पंचायत क्षेत्रात बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. गावातील एका वाडय़ावर एका घरात आलेला पाहुणा कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना तपासणीसाठी नेल्याने पूर्ण परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज पाळीवासियांनी घेतला. आता त्यांचा तपासणी अहवाल काय येईल यावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सरपंच प्रशिला गावडे यांनी दिली.
पाळी गावची लोकसंख्या सुमारे 4500 असून आंबेगाळ, नवरवाडा, देऊळवाडा, परोडा, तोर्ल, तळे, अंतरसे, मस्तक वाडा, कोठंबी, भामई, रुमड इत्यादी लहान वाडे आहेत. तेव्हा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाचे असल्याने भामई येथील बाजारही बंद ठेवण्यात आला होता.









