ऑनलाईन टीम / नागपूर :
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नागपुरमध्ये मंगळवारी 42 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना ग्रस्तांचा आकडा 1076 वर पोहचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसात नागपूरमध्ये 95 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 1076 रुग्णांपैकी सध्या नागपुरात 1034 रुग्ण आहेत. त्यातील 376 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, गांधीबाग, नेहरुबाग, मोमीनपुरा, सतरंजीपुरा, आसीनगर, लकडगंज या भागातील आहेत.
अचानक रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने नागपूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे, नागपूरमधील 1076 रुग्णांपैकी 647 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 17 जणांनी आपला जीव गमावला आहे.









