ऑनलाईन टीम / नागपूर :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. नागपूर शहरातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. असे असले, तरी रस्त्यांवरची गर्दी मात्र, कायम आहे. नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे.
येथील नागरिक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. कोणी भाजी आणण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, रुग्णालयात तर काही अत्यावश्यक सेवेत असल्याची कारणे सांगत फिरताना दिसत आहेत.
दरम्यान, शहरतील बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू असताना कोराडीवरून आलेल्या एका बसमध्ये प्रत्येक सीटवर दोन नागरिक आणि तर काही उभे असे 40 ते 50 प्रवासी होते. यावरून बसमधील प्रवाशी संख्येकडे चालक व वाहकाकंडून दुर्लक्ष केले जात आहे. ज्यांना नोकरीवर किंवा कुठे कामावर जायचे असेल ते बसमध्ये बसतात. त्यांना मुखपट्टी लावण्याबाबतच सूचना केली जाते. मात्र लोक ऐकत नाहीत. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे बस चालकाने सांगितले.