प्रतिनिधी / लातूर
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे ही कायदशीर बाब आहे. परंतु सरकारने नागपूर येथील अधिवेश रद्द करण्याचा डाव आखला अहे. या अधिवेशनात शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षीत आहे. परंतु या सर्व प्रश्नातून सरकारचा पळ काढून घेण्याचा डाव आहे. राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, शेतकर्यांना पुरेशी मदत मिळाली नाही. काही ठिकाणी तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आचार संहितेच्या निमित्ताने शेतकर्यांना करण्यात येणारी मदत थांबवली जात आहे. परंतु यातून मार्ग काढून मदत कशी करता येईल. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील सरकार या सर्व जबाबदारीतून पळ काढत असल्याची टिका भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख आ.संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार आदीसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा पदवीधरसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने लातूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. हॉटेल कार्निवल येथे जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी बैठक घेतली. पक्षाने आजपर्यंत केलेल्या व्हर्च्युअल बैठका, आंदोलन या संदर्भात तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोगत यावेळी त्यांनी घेतले. मराठवाडा पदवीधर संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी विचारविनिमय सुरु आहे.
नुकताच पक्षाने शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली असून ही निवडणुक पूर्ण ताकतीने लढू असे सांगितले. राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु आतापर्यंत सरकारने कोणत्याही शेतकर्यांना पुरेशी मदत दिली नाही. काही भागात आचारसंहितेच्या नावाखाली मदत थांबवली आहे. सरकार मंत्र्याच्या बंगल्यासाठी व नवीन गाड्या घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी मदत करायला पैसा नाही. दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचार्यांनी आत्महत्या केली असून त्यात या सरकारमुळे आत्महत्या केली असल्याचे एका कर्मचार्याने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.
शेतकरी अथवा कामगार तसेच बारा बलुतेदारांना शासनाकडून मिळणारी मदतही होत नाही. उलट राज्यात महिलावर अन्याय होत आहेत. लहान मुलीवर अत्याचार होण्याची संख्या अधिक आहे. सरकारने मराठा आरक्षण तसेच शेतकर्यांना देण्यात येणारी मदत यावर कोणतेही काम केलेले दिसत नाही. या सर्व बाबीतून सरकार पळ काढत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही विरोधक म्हणून तीव्र संघर्ष करणार आहोत. तसेच राज्यातील शेतकर्यांना न्याय देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून कसे करता येईल. यासाठी पक्षाचा प्रयत्न आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









