प्रतिनिधी/सांगली
कालपासून वाळवा तालुक्यात व विशेषतः वारणा नदीच्या कॅच मेन्ट मध्ये सतत पाऊस चालू आहे. नदीचे पाणी पात्र भरून वाहत आहे परंतु पात्र बाहेर नाही. ऐतवडे खुर्द _ निलेवाडी पुलावर पाणी आले असून पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पर्वतवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
कणेगाव कडून भरतवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपर्यंत पाणी येईल असा अंदाज आहे. दरम्यान शिराळा तालुक्यातील मांगले कांदे पूल पाण्याखाली गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कृष्णा व वारणा नदी काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








