वाळवा / वार्ताहर
पलूस तालुक्यातील नागठाणे येथील ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले असून, १५ पैकी नऊ जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतल्या, येथे भाजपला ५ जागा मिळाल्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे, भाजपने याठिकाणी पंचायती वर्चस्व मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, परंतु गेल्या वेळपेक्षा केवळ जास्त मिळुन पाच जागा भाजपच्या पदरात पडलेल्या आहेत.
नागठाणेत काँग्रेसची परंपरेनुसार पुन्हा सत्ता आली असली तरी सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे होते केले होते, परंतु ५ जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत, भाजपला अपेक्षेनुसार यश मिळाले नाही तरीही एक जागा जास्त मिळाली आहे. नागठाणेत भाजप अल्पसंख्य असूनही गावामध्ये भाजपच्या नेत्यांनी मुत्सद्दीपणे राजकीय खेळी करत पाच जागा पदरात पाडून घेतल्याने काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे.
नागठाणेत काँग्रेसच्या जगन्नाथ भानुदास थोरात,रमिजा जाकीर लांडगे, यांनी वार्ड क्रमांक एक मधून विजय मिळवला, वार्ड क्रमांक २ मधून काँग्रेसचे कुमार गणपती शिंदे विजयी झाले, या ठिकाणी दोन जागा काँग्रेसने यापूर्वीच बिनविरोध केल्या आहेत, वार्ड तीनमध्ये काँग्रेसचे सचिन भिमराव देसाई निवडून आलेले आहेत, या वॉर्डमध्ये भाजपने एक उमेदवार न दिल्याने काँग्रेसला चांगले यश मिळाले, वार्ड क्रमांक चारमध्ये अलका शिवाजी यादव या विजय झालेल्या आहेत, वार्ड क्रमांक पाच मध्ये विजय शंकर माने, सविता संजय साळुंखे हे काँग्रेस उमेदवार विजयी झालेले आहेत, भाजपच्या अर्चना रामचंद्र जाधव वार्ड क्रमांक एक मधून विजय झाल्या आहेत, वार्ड क्रमांक तीनमध्ये भाजपच्या निशा किरण बनसोडे विजय झाल्या आहेत, वार्ड क्रमांक चारमध्ये इंद्रजीत बाजीराव पाटील, नागनाथ भाऊ मदने हे भाजपचे उमेदवार विजय झालेले आहेत.
वार्ड क्रमांक पाचमध्ये सागर शिवाजी पाटील हे भाजपचे उमेदवार विजय झालेले आहेत, तर वार्ड क्रमांक ३ मधून तीन अपक्ष उमेदवार उभे होते या ठिकाणी काँग्रेस भाजपमध्ये मोठी चुरस झाली होती, तेथे समीना रज्जाक कोरबी यांनी काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला पराभूत करीत विजयश्री खेचुन आनला आहे, एकंदरीतच काँग्रेसने एकजुटीचा प्रयत्न केला असला तरी सर्व जागांवर काँग्रेसला बहुमत सिद्ध करता आले नाही, आणि भाजपने गेल्या वेळेपेक्षा एक जागा जिंकल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. काँग्रेसने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.








