प्रतिनिधी / सोलापूर
निवृत्ती रंगनाथ ताटे (वय ६५)(मूळ गाव – मानेगाव (धा) सध्या रा. मुंगशी (वा)) हे नागझरी नदीमधून गावाकडे परतत असताना अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने नदीतच अडकले. दुपारी एकच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडचा आधार घेऊन ते थांबले.पण पाणी वाढतच राहीले. त्यानंतर शेडच पाण्याखाली गेले. त्यानंतर शेजारील झाडाचा आधार घेतला,पण तीही फांदी तुटली.
थोडा वेळ पोहले पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले. गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. दुपारी एक वाजल्या पासून चार वाजे पर्यंत हे थरारनाट्य गावकरी अनुभवत होते. मात्र मदतीला कोणेतेच प्रशासन पोहचले नाही. असे त्यांचे जावई पद्माकर क्षीरसागर यांनी सांगितले.
Previous Articleसातारा : 385 जण कोरोनामुक्त, 594 जणांचे नमुने तपासणीला
Next Article सांगली : तासगाव तालुक्यात 28 नवे कोरोना रुग्ण









