प्रतिनिधी / नांद्रे
नांद्रे. ता. मिरज.येथील वाळू तसकरी सन 2019 ते 2021 या तीन वर्षात महापूर, कोरोना, या संकटाच्या भयाने संपुर्ण बंद होती. या संकटाचे सावट कमी होताच वाळू माफीयांनी संबंधीत विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून पुन्हा वाळू तस्करी जोमात सुरू केली आहे.
दोन दिवसापुर्वी मध्यराञी संबधीत विभागातील काही अधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर वाळूसहित धरले, माञ एक मोठी डिल होऊन हे ट्रक्टर सोडण्यात आले. तसेच एक वाळू तस्करी करणाऱ्या बैलगाडिवाल्याला धरून एका अधिकाऱ्याने हप्ता मागितल्याचे कळत आहे. या घडामोडित अधिकारी व वाळू माफीया यांच्यात तडजोड होऊन भल्या मोठ्या हप्त्याची तरतुद करण्यात आल्याचे खाञीदायक माहिती पुढे आली आहे.
सांगली, भिलवडी, ब्रम्हणाळ, खटाव या संबंधीत अधिकाऱ्यांना महिन्याला एक मोठ्या रक्कमेची डिल झालेली असून मध्यराञी बिनधास्तपणे वाळू माफीया रासरोस वाळूची चोरी करून व्रिक्री करून मालामाल होत आहेत. बैलगाडी, ट्रॅक्टर, टेम्पो, आदी वाहनाने वाळू चोरी करण्यात येत आहे. खास वाळू चोरीसाठी गावात नवनवीन वाहन खरेदी करण्यात येत आहे.









